GetSetGo Blogsबुम ला पास - अरुणाचल

सेला पास चा स्नो फॉल चा आनंद मनात ठेवून तवांग च्या 0℃ च्या वातावरणात रात्री सगळे जण गुडचूप झालो. तत्पूर्वी मी उद्याच्या प्रोग्राम बद्दल खात्री करून घेतली ती म्हणजे बुम ला पास , माधुरी लेक ची परमीट मिळाले आहेत. हे परमीट सगळ्यांना आणि सहजासहजी मिळत नाही त्यामुळे मनात धुकधूक होती, पण कसल्याही अडचणी शिवाय परमीट मिळाले होते.

बुम ला पास अर्थात इंडो चायना बॉर्डर (१५५००फूट समुद्र सपाटी पासून उंची) . मी अनेक वेळा कैलास मानसरोवर ला गेल्या मुळे चायना बॉर्डर बद्दल मला नेहमीच उस्तकता असते; या पूर्वी मी नेपाळ चायना फ्रेंडशिप ब्रिज (कोदारी-झाङ्मु) अनेक वेळा क्रॉस केली होती, 2/3 वेळा गंगटोक पासून नथुला पास चायना बॉर्डर ला भेटी दिल्या होत्या. आणि अगदी फेब्रुवारी मध्ये केरुंग (नेपाळ-चायना)बॉर्डर ला भेट दिली होती. पण या बॉर्डर बद्दल विशेष आकर्षण होते कारण याच पवित्र भूमी तुन तिबेटीयन धर्म गुरु दलाई लामा 1959 च्या दरम्यान भारतात आले होते, त्याचा संदर्भ अनेकदा वाचनात आला होता. तो.

या ठिकाणी मोठ्या गाड्या जात नाहीत , छोट्या 6 सीटर जीप / सुमो आशा गाड्या असतात. आम्ही सकाळी लवकरच निघालो . सगळ्या गाड्या एकामागोमाग चालत होत्या. रस्त्या मध्ये अनेकवेळा परमीट आर्मी ऑफिसर कडून चेक होत होते.

पहिल्या चेक पोस्ट ला चेकिंग चालू होते त्या दरम्यान आमचे मराठीत गप्पा ऐकून एका सैनिकांने माझ्या शी गप्पा चालू केल्या त्या ही मराठीत हवालदार रमेश सोनार मी यवतमाळ जिल्यातील वणी चा राहणारा आहे, तुम्ही कुठून आलाय काय नाही गप्पा झाल्या, त्याना फक्त आपण महाराष्ट्रातुन आलोय हे सुद्धा खूप छान वाटत होते.

तेथून गाड्या निघून परत एका ठिकाणी दुसऱ्या चेक पोस्ट वर गाड्या थांबल्या.न ट्रेक.

माझे सहज लक्ष गेले तर ते चेक पोस्ट मराठा रेजिमेंट च्या अखत्यारीत होते; आणि तेथून सहज माझी नजर एका पुतळ्यावर गेली आणि तो पुतळा होता साक्षात आपल्या मराठी लोकांचे दैवत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे. महाराष्ट्र दिनाच्या एक दिवस आधी आपल्या पुण्यापासून 3200 किमी दूर हिमालयाच्या कुशीत आपले

मध्येच कुठे कुठे 4-5 फुट उंचीचे भिंती आणि त्या वर थोडे थोडे गवत आणि बर्फ दिसत होता चौकशी केल्यावर कळले की ते आपल्या सैन्याचे बंकर आहेत म्हणजे आपले सैनिक या हाडे गोठवणार्या थंडीत तिथे राहतात. हळूहळू वातावरणातील थंडी वाढत होती आणि ऊन सावलीचा जणू लपंडाव चालू होता.आणि आता बाहेर भुरभुर कापूस पडावा तसा बर्फ पडत होता आणि आमची उत्सुकता वाढवत होता.

Read More

अरुणाचल

अरुणाचल जेथे सूर्य भारतभूमी ला प्रथम दर्शन देतो. "अरुण भारत भु की अचल मे सर्व प्रथम आता है वह भूमी" म्हणजे अरुणाचल.


काझीरंगा च्या आठवणी घेऊन आम्ही निघालो अरुणाचल च्या दिशेने आणि भालुकपांग येथे एका लाकडी कमानी जवळ गाडी थांबली आणि ड्रायव्हर आमचे परमिट घेऊन आर्मी ऑफिसर ला दाखवण्यासाठी उतरला.


Read More

लँड ऑफ फायर - अझरबैजान

भटकंती करणाऱ्याने काहीतरी नवीन बघायलाच हवे त्याशिवाय त्यांच्या प्रवासाला अर्थ नाही असे म्हणणारे प्रवासी यांच्यासाठी अझरबैजान देश म्हणजे नाविन्याची खाणच म्हणावी लागेल. काहीतरी ऑफबीट करू पाहणाऱ्या लोकांसाठी हा देश अतिशय उत्कृष्ठ पर्यटन स्थळ आहे. 'लँड ऑफ फायर' अशी ओळख असलेला हा देश ना युरोपियन आहे ना धड आशियाई. कॅस्पियन समुद्राला लागून असलेल्या या देशाचा इतिहास सुमारे ५००० वर्षाचा आहे. खनिज तेलाने संपन्न असलेल्या या देशात नितांतसुंदर स्थापत्यकलेचे नमुने आपणास पाहायला मिळतात.

१४ फेब्रुवारीच्या दुपारी दिवसा ढवळ्या आपल्या आर्मीच्या पथकावरवर भ्याड हल्ला झाला आणि अख्खा देश शोकात बुडाला. आमचीही द्विधा मनस्थिती झाली होती; हा हल्ला स्थानिक मदती शिवाय होणार नाही उघड सत्य आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्याही मनात चीड आणि घालमेल चालू होती. काही लोकांनी ती सल आमच्याशी बोलून दाखवली.

Read More

लँड ऑफ फायर - अझरबैजान

भटकंती करणाऱ्याने काहीतरी नवीन बघायलाच हवे त्याशिवाय त्यांच्या प्रवासाला अर्थ नाही असे म्हणणारे प्रवासी यांच्यासाठी अझरबैजान देश म्हणजे नाविन्याची खाणच म्हणावी लागेल. काहीतरी ऑफबीट करू पाहणाऱ्या लोकांसाठी हा देश अतिशय उत्कृष्ठ पर्यटन स्थळ आहे. 'लँड ऑफ फायर' अशी ओळख असलेला हा देश ना युरोपियन आहे ना धड आशियाई. कॅस्पियन समुद्राला लागून असलेल्या या देशाचा इतिहास सुमारे ५००० वर्षाचा आहे. खनिज तेलाने संपन्न असलेल्या या देशात नितांतसुंदर स्थापत्यकलेचे नमुने आपणास पाहायला मिळतात.

१४ फेब्रुवारीच्या दुपारी दिवसा ढवळ्या आपल्या आर्मीच्या पथकावरवर भ्याड हल्ला झाला आणि अख्खा देश शोकात बुडाला. आमचीही द्विधा मनस्थिती झाली होती; हा हल्ला स्थानिक मदती शिवाय होणार नाही उघड सत्य आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्याही मनात चीड आणि घालमेल चालू होती. काही लोकांनी ती सल आमच्याशी बोलून दाखवली.

आम्ही सर्व विचार करून निर्णय घेतला आहे कि या वर्षी आम्ही काश्मीरची टूर नक्की करणार नाही. जेणे करून श्रीनगर , सोनमर्ग , गुलमर्ग , पेहेलगाम या भागातील आपल्या कडून होणारी आर्थिक रसद बंद पडेल; सीमे पलीकडील लोक किती दिवस याना पोसणार याची जाणीव आम्हीही करून देऊ. परंतु ज्या लोकांनी विमानाची तिकिटे काढली आहेत त्यांचे आर्थिक नुकसान होईल कारण विमान कंपन्या हे मान्य करायला तयार नाहीत. परंतु आम्ही आमचे आर्थिक नुकसान किंवा व्यवसायाची चिंता न करता लोकांच्या लोकभावनेचा आदर करत आहोत; ज्यांना पाहिजे असेल त्यांना पूर्ण रिफंड अथवा बाकी टूरचा पर्याय उपलब्ध करून देत आहोत.

मी नाही म्हणत कि सर्वच काश्मीरी वाईट अथवा भारत विरोधी आहेत आणि हा निर्णय आम्ही कोणाला हि घाबरून घेत नाही तर तेथील दगड फेक्या आणि भारत विरोधी लोकांना तेथील च जनता आपल्या सैन्याच्या स्वाधीन करेल कारण त्यांच्या पोटा वर या मुळे गदा येईल. काश्मीर आमचेच आहे पण जे काश्मिरी आमचे नाहीत त्यांना धडा मिळेल आणि ज्यांच्या मुळे आपण सुखाची झोप घेत आहोत त्यांना असे कोणी तरी झोपेत हल्ला करूंन जीवे मारणार नाही माझ्या प्रत्येक सैनिकाचा जीव अमूल्य आहे तो असा वाया जाऊ देणार नाही.

या सोबतच काही ठिकाणी मी वाचले / ऐकले कि अमरनाथ , वैष्णोदेवी यात्रेला जाणार नाही त्यांना धडा शिकवू भुके मारू इत्यादी ..... मी लोकांना आवाहन करीत आहे कि कोणी हि वैष्णोदेवी , अमरनाथ यात्रा जी कि फक्त एक महिन्या साठी मर्यादित असते या यात्राना नकार देऊ नये नाही तर आज जसे कैलास ला जाण्यासाठी जसा पासपोर्ट व्हिसा काढावा लागतोय; ती वेळ येईल काही दिवसांनी आपल्यावर येऊ नये म्हणून सर्वानी या दोन आपल्या हिंदू धर्मातील पवित्र देवस्थानाच्या टूर चालू ठेवाव्या . या लोकांना आपले तिथे येणे नको आहे भावनेच्या आहारी जाऊन आपले तिथे जाणे बंद झाले तर भविष्यात याची जबरी किंमत आपल्याला मोजावि लागेल.

एक वेळ अमरनाथ, वैष्णोदेवी ला जाताना घोडा खेचर पालखी काही हि घेऊ नका जेणे करून त्यांना काम नाही मिळणार ; स्वतःची तब्येत सुधारा चालत जा पण या यात्रा ला जाणे टाळू नका. तसेच पश्चिम काश्मीरच्या चीनच्या जवळील भाग लेह लडाख कडे आपण मनाली मार्गे जाऊ शकतात , लेह मधील लोक मध्ये आपल्या देश बददल आदराचीच भावना आहे ते लोक या भूल थापाना बळी पडत नाहीं . त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे त्यामुळे मनाली मार्गे लेह जाणे टाळू नका भावनेच्या भरात केलेली चूक त्यांच्या पथ्यावरच पडेल. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.

त्या मुळे लेह लदाख अमरनाथ यात्रा वैष्णोव देवी यात्राचे आयोजन पूर्वी प्रमाणेंच राहील.

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली ... .

अमित कुलकर्णी

संचालक

गेट सेट गो हॉलीडेज प्रा ली

दि १९ फेब्रुवारी २०१९ (शिवजयंती )

Read More

लोकांच्या भावना .... आणि आमची सैनिकांना श्रद्धांजली

साधारण आक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान दरवर्षीप्रमाणे आमच्या कडे काश्मीर मधील टूरचे स्थानिक मॅनेजमेन्ट बघणाऱ्या व्हेंडरने भेट दिली आणि ट्युलिप आणि बाकी उन्हाळी सुट्टी दरम्यान घेऊन जाण्याच्या सहलीबद्दलचा विश्वास आमच्या मनात निर्माण केला. मलाही वाटले कि जपानचे चेरी ब्लॉसम टूर करतच आहोत तर ते संपले कि लगेच या धरतीचे नंदनवन व भारताचे मुकुट असलेल्या काश्मीर मधील ट्युलिपची टूर जाहीर केली आणि बघता बघता हाऊसफुल्ल पण झाली.

१४ फेब्रुवारीच्या दुपारी दिवसा ढवळ्या आपल्या आर्मीच्या पथकावरवर भ्याड हल्ला झाला आणि अख्खा देश शोकात बुडाला. आमचीही द्विधा मनस्थिती झाली होती; हा हल्ला स्थानिक मदती शिवाय होणार नाही उघड सत्य आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्याही मनात चीड आणि घालमेल चालू होती. काही लोकांनी ती सल आमच्याशी बोलून दाखवली.

आम्ही सर्व विचार करून निर्णय घेतला आहे कि या वर्षी आम्ही काश्मीरची टूर नक्की करणार नाही. जेणे करून श्रीनगर , सोनमर्ग , गुलमर्ग , पेहेलगाम या भागातील आपल्या कडून होणारी आर्थिक रसद बंद पडेल; सीमे पलीकडील लोक किती दिवस याना पोसणार याची जाणीव आम्हीही करून देऊ. परंतु ज्या लोकांनी विमानाची तिकिटे काढली आहेत त्यांचे आर्थिक नुकसान होईल कारण विमान कंपन्या हे मान्य करायला तयार नाहीत. परंतु आम्ही आमचे आर्थिक नुकसान किंवा व्यवसायाची चिंता न करता लोकांच्या लोकभावनेचा आदर करत आहोत; ज्यांना पाहिजे असेल त्यांना पूर्ण रिफंड अथवा बाकी टूरचा पर्याय उपलब्ध करून देत आहोत.

मी नाही म्हणत कि सर्वच काश्मीरी वाईट अथवा भारत विरोधी आहेत आणि हा निर्णय आम्ही कोणाला हि घाबरून घेत नाही तर तेथील दगड फेक्या आणि भारत विरोधी लोकांना तेथील च जनता आपल्या सैन्याच्या स्वाधीन करेल कारण त्यांच्या पोटा वर या मुळे गदा येईल. काश्मीर आमचेच आहे पण जे काश्मिरी आमचे नाहीत त्यांना धडा मिळेल आणि ज्यांच्या मुळे आपण सुखाची झोप घेत आहोत त्यांना असे कोणी तरी झोपेत हल्ला करूंन जीवे मारणार नाही माझ्या प्रत्येक सैनिकाचा जीव अमूल्य आहे तो असा वाया जाऊ देणार नाही.

या सोबतच काही ठिकाणी मी वाचले / ऐकले कि अमरनाथ , वैष्णोदेवी यात्रेला जाणार नाही त्यांना धडा शिकवू भुके मारू इत्यादी ..... मी लोकांना आवाहन करीत आहे कि कोणी हि वैष्णोदेवी , अमरनाथ यात्रा जी कि फक्त एक महिन्या साठी मर्यादित असते या यात्राना नकार देऊ नये नाही तर आज जसे कैलास ला जाण्यासाठी जसा पासपोर्ट व्हिसा काढावा लागतोय; ती वेळ येईल काही दिवसांनी आपल्यावर येऊ नये म्हणून सर्वानी या दोन आपल्या हिंदू धर्मातील पवित्र देवस्थानाच्या टूर चालू ठेवाव्या . या लोकांना आपले तिथे येणे नको आहे भावनेच्या आहारी जाऊन आपले तिथे जाणे बंद झाले तर भविष्यात याची जबरी किंमत आपल्याला मोजावि लागेल.

एक वेळ अमरनाथ, वैष्णोदेवी ला जाताना घोडा खेचर पालखी काही हि घेऊ नका जेणे करून त्यांना काम नाही मिळणार ; स्वतःची तब्येत सुधारा चालत जा पण या यात्रा ला जाणे टाळू नका. तसेच पश्चिम काश्मीरच्या चीनच्या जवळील भाग लेह लडाख कडे आपण मनाली मार्गे जाऊ शकतात , लेह मधील लोक मध्ये आपल्या देश बददल आदराचीच भावना आहे ते लोक या भूल थापाना बळी पडत नाहीं . त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे त्यामुळे मनाली मार्गे लेह जाणे टाळू नका भावनेच्या भरात केलेली चूक त्यांच्या पथ्यावरच पडेल. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.

त्या मुळे लेह लदाख अमरनाथ यात्रा वैष्णोव देवी यात्राचे आयोजन पूर्वी प्रमाणेंच राहील.

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली ... .

अमित कुलकर्णी

संचालक

गेट सेट गो हॉलीडेज प्रा ली

दि १९ फेब्रुवारी २०१९ (शिवजयंती )

Read More

रहस्य भाग १० ( कैलास पर्वत )... विनीत वर्तक

कैलास पर्वत ट्रान्सहिमालीयन आणि चीन च्या तिबेट भागात वसलेला आहे. ६,६३८ मीटर ( २१,७७८ फुट ) इतकी उंची असलेला हा पर्वत जगातील सगळ्यात अधिक रहस्यमयी पर्वत मानला जातो. ह्याला कारण त्याच अनेक धर्मामधील पवित्र स्थान आणि त्या जोडीला त्याच्या भोवती अनुभवायला येणाऱ्या गोष्टींमुळे त्याच्य रहस्यमयी रूप अजून गडद झालं आहे. एवरेस्ट हे जगातील सर्वाधिक उंचीच शिखर (८८५० मीटर) आजवर अनेक लोकांनी सर केलं आहे. पण कैलास पर्वत हे आजही कोणत्याच मानवाने सर केलं गेलेलं नाही. जिकडे ८८५० मीटर पेक्षा जास्त उंचीच शिखर सर केलं जाते तिकडे ६६३८ मीटर उंची असलेलं कैलास पर्वत सर करायला अडचण यायला नको पण कैलास पर्वत हा इतक्या रहस्यांनी वेढलेला आहे की आज तिकडे जाणं हेच पूर्णतः निषिद्ध अथवा बंद केलं गेलं आहे.

कैलास पर्वताला बोन, बौद्ध ,हिंदू आणि जैन धर्मात अतिशय पावित्र्याच स्थान आहे. हिंदू धर्मात कैलास पर्वत हा आपल्या प्रकृतीचा निर्माता आणि त्या प्रकृतीला नष्ट करण्याची क्षमता असणाऱ्या श्री शंकराच निवासस्थान मानलं गेलं आहे. त्यामुळेच कैलास पर्वतावर चढाई करण हे हिंदू धर्मात निषिद्ध मानलं गेलं आहे. इतर धर्मांच्या धार्मिक प्रथेतही कैलास पर्वत हा कोणत्याही मानवासाठी निषिद्ध मानला गेला आहे. पण असं असताना १९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरवातीला जगातील अनेक साहसी गिर्यारोहकांनी हे शिखर सर करण्याचा प्रयत्न केला. पण एकालाही ह्यात यश आलं नाही. ह्यातील एक कर्नल विल्सन ह्यांनी शिखरावर जातानाचा अनुभव आपल्या शब्दात लिहून ठेवला आहे. ते म्हणतात,

“Just when I discovered an easy walk to the summit of the mountain, heavy snow began to fall, making the ascent impossible.”

ह्या शिवाय रशियन गिर्यारोहक सर्जी क्रिस्तीकोव ला आलेला अनुभव तर खूपच विलक्षण आहे, सर्जी म्हणतो,

“When we approached the foot of the mountain, my heart was pounding. I was in front of the sacred mountain, Mount which says it cannot be beat. I felt extremely emaciated and suddenly I became captivated by the thought that I do not belong on this mountain, it must necessarily come back! As soon as we started the descent, I felt liberated".

कैलास पर्वताला भेट देणाऱ्या अनेकांना आपले केस व नख अचानक खूप वेगाने वाढण्याचा अनुभव आलेला आहे. अवघ्या १२ तासात केस आणि नख जितकी २ आठवड्यात वाढतात तितक्या वेगाने त्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ह्या पर्वताच्या आजूबाजूला असणाऱ्या हवेमुळे इकडे अतिशय वेगात वय वाढते. सर्बिया मधील काही गिर्यारोहकांनी ह्यावर चढाई करण्याचा प्रयत्न केला पण अचानक त्याचं वय वाढत असल्याचा त्यांना अनुभव आला. ते माघारी फिरले पण एका वर्षातच त्या सर्वांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला.

अनेक रशियन संशोधकांनी कैलास पर्वताचा खूप अभ्यास केला. १९९९ साली रशियन नेत्ररोग विशेतज्ञ एरनेस्ट मुलाडेशेव ह्यांनी कैलास पर्वताचा अभ्यास करण्यासाठी एक मोहीम आखली. ह्या मोहिमेत जीओलॉजी, इतिहास, फिजिक्स मधील अनेक तज्ञ भाग होते. कैलास पर्वताच्या पायथ्याशी अनेक महिने अभ्यास केल्यावर त्यांनी मत मांडल की कैलास पर्वत एक मानवनिर्मित पिऱ्यामिड आहे. ह्याच्या भोवती अनेक लहान पिऱ्यामिड ची श्रुंखला असून हे सगळं एका असामान्य घटनेचा भाग आहेत. एरनेस्ट ह्यांनी लिहिलं आहे,

“It is hard for me to discuss this topic from a scientific point of view. But I can quite positively say that Kailash complex is directly related to life on Earth, and when we did a schematic map of the ‘City of the Gods,’ consisting of pyramids and stone mirrors, we were very surprised – the scheme was similar to the spatial structure of DNA molecules.”

कैलास पर्वताला सगळ्या जगाच केंद्रबिंदू मानलं गेलं आहे. फिजिकल जग आणि स्पिरीच्युअल जग जिकडे मिळते त्या स्वर्गाचा रस्ता कैलास पर्वतावर आहे असं म्हंटल जाते. म्हणून ह्या पर्वताच अनन्यसाधारण महत्व जगातील बिलियन लोकांच्या मनात आहे. २००१ साली चीन सरकारने एका स्पेन च्या टीम ला ह्या पर्वतावर मोहीम आखण्यास परवानगी दिली होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कैलास पर्वताच पावित्र्य लक्षात घेता त्या दबावाखाली चीन सरकारला अश्या मोहिमांवर कायस्वरूपी बंदी आणावी लागली.

कैलास पर्वताच्या बाजूला दोन जलायश आहेत. त्यातील एक आहे ४५९० मीटर ( १५,०६० फुट) उंचीवर असलेल जगातील सर्वाधिक उंचीवरच मानसरोवर. ४१० चौरस किमी क्षेत्रफळ असलेलं, ९० मीटर खोल असलेलं हे सरोवर गोल आहे. ह्यातून ब्रह्मपुत्रा, इंडस, घागरा ह्या नद्यांचा उगम होतो. मानसरोवर च पौराणिक महत्व खूप आहे. पण त्याच्या फक्त ३.७ किलोमीटर अंतरावर असलेलं राक्षसतळ मात्र ह्या पेक्षा पूर्णतः वेगळं आहे. राक्षसतळ हे रावणाने शंकराला प्रसन्न करताना बनवलं गेल्याची कथा आहे. त्यामुळे ह्याच पाणी खारट आहे. ह्याच्या उत्तरेकडून सतलज नदीचा उगम होतो. दोन्ही जलाशय इतक्या जवळ असून पण ह्या दोन्ही तळ्यांच्या पाण्यात आणि जैवविविधतेत खूप वेगळेपणा आहे. राक्षसतळ्यात कोणतेही जलचर आणि जल वनस्पतीचं अस्तित्व आढळून येत नाही. ह्याच पाणी नेहमी अशांत असते. तर मानसरोवर च पाणी अतिशय शांत आहे. कितीही वारे वाहिले आणि हवेचा जोर असला तरी मानसरोवरा मधील पाणी नेहमीच शांत रहाते.

विज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजूनही काही प्रश्नांना उत्तर शोधू शकलेलं नाही. कैलास पर्वताचा एकूणच आकार, त्याच वातावरण तसेच तिथे येत असलेले अनुभव हे सध्या तरी एक रहस्य आहे. कैलास पर्वताचा उल्लेख अगदी वेदांनमध्ये ही केला गेलं आहे. त्यातही कैलास पर्वत हा पृथ्वीचा मध्य असल्याच म्हंटल गेलं आहे. हे शिखर तिबेट इथल्या मिलारेपा ह्या बौद्ध भिक्षूने ९०० वर्षापूर्वी सर केल्याच बोललं जाते. व त्यांनीही पुन्हा ह्यावर चढाई केली जाऊ नये असं बोलल्याची आख्यायिका आहे. १९८० ला चीन सरकारने प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहोल्ड मिसनेर ज्यांनी जगातील ८००० मीटर ( २६,००० फुट) पेक्षा जास्ती उंचीची सगळी म्हणजे १४ शिखर सर केली आहेत त्यांना कैलास पर्वतावर आरोहण करण्यासाठी बोलावलं होतं. पण त्याने ते निमंत्रण नाकारलं होतं. राईनहोल्ड मिसनेर ह्यांनी एकदा म्हंटल होतं

“If we conquer this mountain, then we conquer something in people's souls. I would suggest they go and climb something a little harder. Kailas is not so high and not so hard.”

असा हा पवित्र, अदभूत कैलास पर्वत आपल्या सोबत अनेक रहस्य घेऊन आजही हिमालयात उभा आहे. कैलास मानसरोवर यात्रा आजही अनेक खडतर यात्रांपेकी गणली जाते. ह्याच कारण ह्याच्या आसपास न कोणता विमानतळ आहे, न रस्ते आहेत, न कोणतं बंदर आहे. इकडे जायचं असेल तर त्या निसर्गाला शरण जाऊन खडतर पायी प्रवास केल्यावरच ह्या अगम्य पर्वताच दर्शन मानवाला होते. अश्या ह्या रहस्यमयी पर्वताला माझा नमस्कार.

माहिती स्त्रोत :- गुगल, विकिपीडिया

या अशा पवित्र ठिकाणी पवित्र मनाने यात्रा घडवून आणण्याचे कार्य आमची कंपनी रघुकुल हॉलिडेज आणि गेट सेट गो हॉलिडेजच्या माध्यमातून मागची 9वर्षे अविरत पणे करते आहे.

या वर्षी ही मे पासुन सप्टेंबर पर्यंत या यात्राचे आयोजन केले आहे.

इच्छुकांना विनंती आहे या संधीचा नक्की लाभ घ्या.

खात्रीशीर सल्ल्यांसाठी सम्पर्क करा

अमित कुलकर्णी +918975024242
रोहन कुलकर्णी +918308821692

Read More

भारतीय पर्यटक आणि जग

परवाच एका वर्तमानपत्रात एक बातमी वाचली की एका कंपनीने आपल्या 1300 कर्मचाऱ्यांना एका इंसेंटिव्ह टूर दरम्यान क्रूझ वर नेले होते. वाचून आनंद झाला पण बातमी पुढे वाचली तर धक्का बसला की या भारतीय कर्मचाऱ्यांनी त्या क्रूझ वर घातलेल्या गोंधळामुळे क्रूझ कंपनीला बाकीच्या 1700 पर्यटकांना तिकिटाचे पैसे आणि सोबत दंड म्हणून काही रक्कम परत करावी लागली आणि माफी पण मागावी लागली.

का तर म्हणे या 1300 लोकांनी क्रूझ वर एवढी हुल्लडबाजी केली की बाकी 1700 लोकांनी क्रूझ व्यवस्थापनाकडे तक्रार करून त्यांना झालेल्या त्रासाबद्दल आणि त्यांच्या सुट्टीचा हिरमोड झाल्याबद्दल कंपनीला दंड द्यावा लागला. असे का व्हावे? का भारतीय पर्यटकांना काही आचारसंहिता नाही राहत टूर वर गेल्यावर?

मी मागची 11 वर्षे या क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे या विषयी माझे अनुभव तुमच्याशी शेअर करावे वाटतात.

आज जगाच्या पाठीवर भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. आज जगात कुठेही गेले आणि विचारले की कुठून जास्त पर्यटक येतात तेव्हा आम्हाला उत्तर मिळते पहिला देश चीन आणि दुसरा भारत. भारतीय लोकांकडे पैसे आहेत फिरण्याची आवड आहे त्यामुळे आज जगात 2 नंबरचा देश म्हणून सगळीकडे मान्यता मिळत आहे.

पण सगळ्यात घाणेरडे लोक, बेशिस्त, मॅनर्स नसलेले, एटीकेट न पाळणारे लोक, वेळ न पाळणारे लोक म्हणून का भारतीय पर्यटकांना पाहिले जात आहे?काही मोठ्या हॉटेल्स मध्ये भारतीय ग्रुप्सला रूम देणे टाळले जाते.

मला एकदा असाच अनुभव आला.माझी मुलगी ओवी 4 वर्षाची होती आणि आम्ही थायलंडला गेलो होतो, ब्रेकफास्ट नंतर तिच्यासाठी म्हणून काही फ्रुटस डब्यात घ्यावे म्हणून मी रेस्टॉरंट मॅनेजरकडे विनंती केली असता त्यांनी मनाई केली. तुम्ही रूम मधून ऑर्डर करा मी देतो, लहान मूल आहे पण सॉरी बोलला. मी थोडे जाणून घेता कळले की काही भारतीय लोक ब्रेकफास्ट नंतर बाटल्या भरून ज्युस, डबे भरून फ्रुट , दुपारचे जेवण वाचवण्यासाठी ब्रेड असे सगळे भरून नेतात. कसला काही लिमिटच नाही म्हणून आम्ही आता बॉटल आणि डब्या ना बंदी घातली आहे आणि आम्ही लक्ष ठेवुन असतो. या अशा वागण्यामुळे खऱ्या गरजूना पण बंदीला सामोरे जावे लागते.

वेळेच्या बाबतीत तर भारतीय लोकाएवढे कोणीच बदनाम नाही. जपान टूरच्या वेळी तर जपानचा लोकल गाईड किती तरी वेळा टोचून टोचून भारतीय प्रमाण वेळे विषयी बोलायचा यावरून माझ्या सारखे वेळ पाळणारे लोक पण बदनाम होतात. 15 /20 मिनिट उशीर तर आपली लोक हक्काने करतात आणि वर म्हणतात की 20 च मिनिट तर उशीर झालाय. परवाच एका कंपनी कडून बस ड्रायव्हरने 1 तास उशीर झाला म्हणून दंड म्हणून जापनीज येन 40000 घेतले.

रशियाच्या टूर मध्ये पण असाच अनुभव आला 12 च मिनिट उशीर झाला आहे आम्हाला बस गेली तर माझी चूक नाही म्हणून पण हुज्जत घातली.

बुलेट ट्रेन मध्ये मोबाईल वापरायचा नसतो, मोठ्याने बोलायचे नाही असे 10 वेळा बजावूनही ट्रेन चालू असताना व्हिडीओ कॉल करून मोठमोठ्यानि बोलणारे लोक मी पाहतो. फोन बंद करा अशी विनंती केली तर आम्ही पैसे भरले आहेत आम्हाला आनंद घेऊ द्या असे उत्तर मिळते. काही वेळेला आम्ही पण हतबल होऊन जातो.

सरकत्या जिन्याने चालताना जपानमध्ये डाव्या बाजूला आणि रशिया मध्ये उजव्याबाजूला थांबावं लागत. ते लोक एवढा विचार करतात.

सिग्नल असताना आणि फक्त झेब्रा क्रॉससिंग असेल तेथून रस्ता क्रॉस करावा अशा सूचना देऊनही काही भारतीय पर्यटक सोयीने विसरतात.

क्रूझ वर, क्लब आणि पब मध्ये हुल्लडबाजी करणे अनैतिक वागणे हे तर हक्काने आले. या अशा वागण्यामुळे आपल्या देशाचा अपमान होतोय. आपला देशाभिमान फक्त भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच, 15 ऑगस्ट, 26 जानेवारीलाच का जागा होतो?

उद्या एखाद्या चांगल्या भारतीय पर्यटकांना पाहण्याचा दृष्टीकोन पण त्या क्रूझवाल्यांचा बदलला तर कोण जिम्मेदार आहे त्याला?

माझ्या सारख्या ट्रॅव्हल एजंटची पण खूप जबाबदारी वाढली आहे, आम्हाला प्रत्येक देशाची आचारसंहिता, वागण्याची पध्दती पर्यटकांना समजाऊन सांगितली पाहिजे आणि ती अमलात आणली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे.

मी अगदी सगळ्याच भारतीय पर्यटकांना दोष देत नाही पण बऱ्याच लोकांकडून असे होत आहे तर सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आपल्या भारताची, भारतीय संस्कृतीचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

- अमित कुलकर्णी
सीइओ आणि संस्थापक
गेट सेट गो हॉलिडेज प्रा ली
पुणे
(11.10.2018)

Read More

रवि वाळेकर

कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकाची सत्ता होती. वर्ष होते १८६०. त्या काळोख्या दाट जंगलात पुढे पाऊल ठेवण्यासाठी त्याला झुडपे, वेली तोडतच पुढे जावे लागतं होते. किर्र जंगलात शोधता शोधता अचानक त्याला समोर असे काही दिसले की त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले! क्षणभरं त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना!

समोर होती, त्याच्या नजरेच्या कवेत मावत नव्हती, एवढी प्रचंड इमारत! संपूर्ण दगडात बांधलेली! जंगलामध्ये लुप्त! शेकडो वर्षांपासून मानवी हस्तक्षेपासून दूर, महाकाय झाडांनी वेढलेली.

अवाढव्य, महाप्रचंड आणि अदभूत!

खरेतरं, अविश्वसनीय!

त्याने त्याच्या आयुष्यात एवढी महाप्रचंड इमारत पाहिली नव्हती. त्यानेचं काय, संपुर्ण युरोप खंडात कोणीही अशी इमारत पाहिली नव्हती. पाहणार तरी कशी? कारण एवढ्या प्रचंड आकाराची इमारत संपूर्ण युरोपमध्ये नव्हतीचं! कोणी बांधण्याचा विचारही करू शकतं नव्हते. आधुनिक तंत्रज्ञानात स्वत:ला खुप प्रगत समजणाऱ्या संपुर्ण युरोपला आणि जगाला थक्क करणारी ही घटना होती! हे एक मंदिर होते.

नाव होते, 'अंग्कोर वाट'!

एक मंदिर!

भारतापासून ५००० किलोमीटर दुर देशातील एक हिंदू मंदिर!

आजमितीसही, 'अंग्कोर वाट' जगातले सर्वात मोठे प्रार्थना स्थळ आहे! जगात कुठल्याही धर्माचे एवढे मोठे प्रार्थनास्थळ नाही.

एवढे अवाढव्य प्रार्थनास्थळ त्यापुर्वी ना कोणी बांधले होते, ना कोणी नंतर बांधू शकला!

एका कंबोडियन हिंदू सम्राटाने हे बांधले होते १२व्या शतकात! इसवीसन ११५०च्या सुमारास!

मात्र, १५व्या शतकापासून काही अनाकलनीय कारणाने ते जंगलात लुप्त झाले होते. मंदिरातले बोटावर मोजण्याएवढे बौद्ध भिक्षू आणि मंदिर परीसरात राहणारे काही आदिवासी खेडूत वगळता, शेकडो किलोमीटर अंतरात लोकवस्तीही नव्हती...

५०० एकर एवढ्या भव्य क्षेत्रफळावर बांधलेले 'अंग्कोर वाट' मंदिर आहे, भगवान विष्णूचे!

पश्चिममूखी असलेले हे मंदिर किती भव्य असावे? मुख्य प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत पोहोचायलाचं ३ ते ४ किलोमीटर चालावे लागते! मंदिराच्या सभोवती एक आयताकृती कालवा आहे, त्याचीच एकत्रित लांबी ५.५ किलोमीटर आहे!

४ मिटर खोल असलेल्या या कालव्याची रूंदी आहे २५० मिटर म्हणजे पाव किलोमीटर! हा कालवा ओलांडूनच मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतां येते! फक्त पहिल्या प्रवेशद्वारापाशी, मंदिरात नाही!

पुढे अशी अजून दोन प्रवेशद्वारे ओलांडूनचं आपण मुख्य मंदिराजवळ येतो!

तत्कालीन कंबोडियन हिंदू राजा (दुसऱ्या) सुर्यवर्मनने हे भव्यदिव्य मंदिर घडवले, तेव्हा कालांतराने ही वास्तू जगातल्या सात आश्चर्यांपैकी मानली जाईल, असे त्याला वाटलेही नसेल!

'अंग्कोर वाट'पेक्षा आकाराने निम्म्या वा त्याहूनही छोटे असणाऱ्या युरोपातले 'कॅथेड्रल्स' बांधायला १५० ते २०० वर्षे लागली, काहींना ३००!

दुसऱ्या सुर्यवर्मनने हे मंदिर घडवले ते फक्त ३० ते ३५ वर्षात!

लाखो कंबोडियन नागरिक,कामगार, कारागीर, मूर्तीकार, निष्णात अभियंते, वास्तूरचनाकार, शेकडो हत्ती, हजारो बैलगाड्या, तराफे या मंदिरासाठी ३५ वर्षे अविरतं झटतं होते!

४८ लाख टनांपेक्षा जास्त दगड लागले, ही वास्तू पुर्ण करण्यासाठी. बरं हा दगडही मंदिराच्या जवळपास ऊपलब्ध नव्हता, तो आणावा लागला दुर असलेला महेंद्र नामक पर्वत फोडून. रस्तामार्गे हे जड दगड वाहाणे अशक्य होते. नदीतून आणावे म्हंटले तर अशी नदीही या बांधकाम स्थानापासून दुर होती. अंतर जवळपास ८०-९० किलोमीटर होत होते. एवढे वजनदार आणि एवढ्या संख्येने दगड वाहून आणने, महाकठीण काम.

दुसऱ्या सुर्यवर्मनकडे या अवाढव्य महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. वैभवशाली राज्य असल्याने पैशांचा तर महापुर होता, नव्हता तो फक्त वेळ! त्याला त्याच्या जिवनकालातचं हे मंदिर पुर्ण करायचे होते. मग या राजाच्या बुद्धिमान अभियंत्यांनी महेंद्र पर्वतापासून मंदिराच्या स्थानापर्यंत महाप्रचंड असे कालव्यांचे जाळे ऊभारले!

सारेचं अवाढव्य!

डोंगरातून कापलेले दगड तराफ्याने कालव्यांमार्गे बांधकामाच्या ठिकाणी आणले जायचे, तिथे त्यांना जरूरीप्रमाणे कापले जायचे. एकमेकांवर घासून हे कठीण दगड चारही बाजूने सपाट केले जायचे आणि मग बांधकामात वापरले जायचे! दगडाचे असे किती तुकडे एकूण बांधकामासाठी लागले, याची मोजदाद अशक्य!

या साऱ्या बांधकामासाठी ना सिमेंट, ना काँक्रीट ना लोखंड! सगळे बांधकाम दगडावर दगड रचून साकारायचे म्हणजे अतिशय कठीण आणि जोखमीचे काम!

आतमध्ये दगडी भित्तिचित्रे असलेल्या दोन-दोन किलोमीटर लांब दगडी 'गॅलरीज' आहेत (यांचे छप्परसुद्धा दगडाचेच). त्यांना आधार द्यायला जे असंख्य खांब आहेत, ते सगळे इतके काटेकोरपणे सरळ रांगेत की तसुभरही फरक नाही.

एक मिलिमीटर सुद्धा मागे पुढे नाही! आजकालच्या 'लेझर' किरणांच्या तोडीस तोड तंत्रज्ञान! बांधकामातले कौशल्य अचंबीत करते! अतिशय अवघड असे हे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाविषयी फारशी माहिती आता ऊपलब्ध नाही, पण हे लोक फारचं प्रगत तंत्रज्ञान वापरत होते, यात शंकाच नाही!

अशा ३ गॅलरीज आहेत. ह्या ज्या लांबलचक गॅलरीज आहेत, त्यांनी संपुर्ण मंदिराला विळखा घातलायं. २५० मिटरचा कालवा ओलांडून आले की, एक प्रवेशद्वार. ते ओलांडून एक-दिड किलोमीटर पार केल्यावर दुसरे प्रवेशद्वारं. हे प्रवेशद्वार पहिल्या आयताकृती महाप्रचंड गॅलरीचा भाग आहे. ते पार करून थोड्या ऊंचावर दुसरी आयताकार गॅलरी सुरू होते. ती पार करून मग तिसरी आणि मग मुख्य मंदिराची सुरुवात!

या सगळ्या गॅलरीज एकापेक्षा एक ऊंचावर आहेत. एका पिरॅमिड सारखी रचना. सगळ्यात वर मंदिराचे आभाळात घुसलेले ५ कळसं.... एक मुख्य कळस मध्यभागी आणि चार उपदिशांना ऊंचीने थोडे कमी असलेले चार कळस. सुरूवातीला ओलांडून यायच्या कालव्यापासून ऊंची मोजली, तर मुख्य कळसाची ऊंची २३३ मिटर आहे! म्हणजेचं ७०-८० मजली ऊंच इमारती एवढी!

हे मंदिर पुर्ण झाले आणि आजुबाजुला लोकवस्ती झाली, तेव्हा लंडनची लोकसंख्या होती ३०,०००, आणि 'अंग्कोर'ची लोकसंख्या होती दहा लाख!

युरोपात औद्योगिक क्रांती होण्याअगोदरचे जगातले सर्वात मोठे शहर!

बांधकामाच्या कलेत आणि शास्त्रात प्राविण्य असलेले, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, एक सुसंस्कृत शहरं!

( हे भरभराटीला आलेले शहर, मंदिर पुढच्या दोन-तिनशे वर्षांत, ओसाड पडेल, असे तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटले नसेल....) आजही भल्या भल्या अभियंत्यांना तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या या मंदिराची रचना, बांधणी त्याकाळी कशी केली अ/सेल या विचाराने थक्क व्हायला होते!

या गॅलरीजमध्ये अडीच मिटर ऊंच आणि एकत्रित साडेचार किलोमीटर लांब अशी दगडात कोरलेली असंख्य आणि अखंड भित्तिचित्रे आहेत!

पौराणिक कथा, रामायण, महाभारत आणि दुसऱ्या सुर्यवर्मनची कारकिर्द दगडात कोरलीयं!

मंदिरात जवळपास १५०० अप्सरा कोरल्यात, प्रत्येक अप्सरा वेगळी! एकीसारखी दुसरी नाही. सारख्या वाटल्या आणि निरखून पाहिले तर क.ते पैंजण तरी वेगळे असेल, बाजुबंद तरी वेगळा असेल, हार वा कंगण तरी वेगळे असेल वा केशभूषा! अविश्वसनीय आणि अतर्क्य!

ही सगळी भित्तिचित्रे बघायची म्हंटली तर चार-पाच किलोमीटरची पायपीट आलीचं! हे सारे कोरीवकाम दगडी भिंतीवर तिन ते चार इंच खोलीत!

हे कोरणे तर अवघडंच, पण असा एवढा मोठा 'कॅनव्हास' तयार करणेही सोपे नव्हते. एकावर एक अशा दहा-बारा शिळा चढवून भिंत बनवलेली. दोन दगडांमध्ये हवासुद्धा जाऊ नये इतके एकमेकांवर घासायचे, नंतर पुर्ण भिंत नाजूक छिन्नी-हातोड्याने एकसंध बनवायची आणि मुर्तीकारांच्या सुपूर्द करायची.

मग या कलाकारांचे कोरायचे काम सुरू! भित्तिचित्रे कोरताना एखाद्यावेळी हातोडा जोरात पडला, एखादी चुक झालीच, तर संपूर्ण भिंतच परत रचायची! परतं सपाट करायची आणि परत पहिल्यापासून कोरायला सुरूवात करायची!

असे अवाढव्य मंदिर बांधायची कल्पना करणे, असंख्य अडचणींवर मात करून ती कल्पना प्रत्यक्षात आणने, हे सारेचं अफलातून! असे म्हणतात की या मंदिराच्या ऊभारणीसाठी दुसऱ्या सुर्यवर्मनच्या राज्यातील प्रत्येक कुटूंबातील एकजण तरी सहभागी होता. धन्य ती सारीचं मंडळी!

हे असले काही भव्यदिव्य पाहिले की हात आपोआप जोडल्या जातात. भारतीयांच्या तत्कालीन स्थापत्यज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा अभिमान वाटतो आणि आपण किती महान संस्कृतीत जन्माला आलोयं, याची जाणीव होते!

(हे मंदिर का बांधले, गाभाऱ्यातून विष्णूमुर्ती का हलवली, मंदिर जवळपास पाचशे वर्षे ओसाड का पडले आणि इतर बरेचं काही पुढच्या भागात....)

हे सगळे आपल्या डोळ्याने अनुभवायचे असेल ते पण गेट सेट गो च्या एक्स्पर्ट टीम सोबत तर शेवटच्या 6 सीट्स उपलब्ध आहेत. प्रस्थान 12 नोव्हेंबर

किंमत: 124999.00

सवलतीच्या दरात: 114999.00/

संपर्क: अमित कुलकर्णी

गेट सेट गो हॉलिडेज प्रा लिमिटेड

+91 8975024242

Read More

रशिया मॉस्को मेट्रो

मॉस्कोच्या सिटी टूर दरम्यान मी मुद्दाम तेथील मेट्रोची टूर ठेवली होती. तेथील स्टेशन पाहताना ८५ वर्षांपूर्वी त्यांनी काय टेकनॉलॉजी वापरली असेल, किती पुढील विचार करून स्टेशन, जिने, प्लॅटफॉर्म बांधली असतील याचा विचार करून वेडे व्हायला होते. आज एवढी गर्दी वाढून ही तेथील ते जुने बांधकाम, जुने सरकते जिने सगळ्या गोष्टी अव्याहत पणे चालू आहेत आणि त्यात कुठे ही कधी ही अडचण येत नाही हे सांगताना त्या रशियन गाईड ला किती अभिमान वाटत होता.

१९३५ मध्ये मॉस्को मेट्रोचा पहिला टप्पा चालू झाला तेव्हा ती ११ किमी मध्ये १३ स्टेशन होते. सोविएत राष्ट्रसंघात ती पहिली मेट्रो लाईन होती. आज २०१८ मध्ये २२२ स्टेशन सह ३८० किमी चे अंतर ते पूर्ण करते. जगातील ७ व्या क्रमांकाचे हे मेट्रो चे जाळे आहे. वैशिष्ट्ये म्हणजे या मेट्रोचा जास्तीत जास्त भाग हा भुयारी (अंडर ग्राउंड) आहे. आणि यातील सगळ्यात खोल (डिप्पेस्ट) स्टेशन ८४ मीटर (२७६ फूट) खोल आहे. पार्क पोबेडीहे जगातील सगळ्यात खोल (जमिनी पासून खाली) असलेलं स्टेशन आहे.

प्रत्येक स्टेशन हे एक राजमहाल प्रमाणे बांधले आहे, तेथील प्रकाश योजना, झुंबर , सरकते जिने, प्रशस्त प्लॅटफॉर्म हे त्या काळी हा देश महासत्ता होता हे अधोरेखित करत होते आणि आज ही ते वैभव त्यांनी जपले आहे. आम्ही जवळपास १२ स्टेशन पहिले प्रत्येक स्टेशनची रचना वेगळी, वैभव वेगळे, सगळे काही डोळे दिपवणारे होते.

मला आपल्या देशाला कमी लेखायचे नाही पण आपले व्ही टी (आताचे सी एस टी) स्टेशन जे इंग्रजांनी बांधले त्याचा आपण किती गवगवा करतो, त्याचीच देखभाल करता करता अपल्याला नाकी नऊ येतात. आणि त्या सारखे एक ही स्टेशन काय इमारत देखील आपण मागील ७५ वर्षात बांधू शकलो नाही हा विचार मनात येऊन गेल्या शिवाय राहत नाही.

एवढे नक्की की मॉस्को ला गेलात कधी तर नक्की ही मेट्रोची राईड करा एक वेगळा अनुभव सोबत घेऊन तुम्ही याल हे नक्की. सोबत काही प्लॅटफॉर्म चे मोबाइल कॅमेरा मधून काढलेले फोटो देत आहे त्यातून त्या स्टेशन चे सौन्दर्य तुमच्या लक्षात येईल.

बाकी ही बरेच काही सांगण्या सारखे आहे रशिया बद्दल ..... बोलूच पुढे त्या विषयावर ही.....

अमित कुलकर्णी
सी ई ओ & संस्थापक
गेट सेट गो हॉलिडेज प्रा ली
०७. १०. २०१८

Read More